सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १५ वा हंगाम सुरु आहे. या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स हा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. केकेआरने ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर हा सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. व्यंकटेश अय्यर आणि तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे प्रियांकाने केलेल्या एका कमेंटवरुन तिला ट्रोलही केले जात आहे.
तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकर हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमधील फोटो पोस्ट केले होते. या फोटोत ती एका पडद्यामागून डोकावताना दिसत आहे. यात ती फार गोड दिसत आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. नुकतंच तिच्या या फोटोवर अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याने कमेंट केली आहे. तिच्या फोटोवर कमेंट करताना व्यंकटेशने क्यूट असे म्हटले आहे. मात्र त्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया देताना तू कोण? असा प्रश्न त्याला विचारला आहे. दरम्यान तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडिया युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अनेकांनी तिच्या या कमेंट खाली तिला सडेतोड उत्तर दिली आहे. कदाचित तुला माहिती नाही तो नक्की कोण आहे? अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने म्हटले की तू त्याचं नाव नीट वाचलं नाहीस का? असा प्रश्न विचारला आहे. तो तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे, अशीही कमेंट एकाने तिच्या या पोस्टवर केली आहे.
कोण आहे प्रियांका जवळकर?
प्रियंका जवळकर ही तेलुगू सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०१७ मध्ये तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. अभिनेता विजय देवरकोंडाच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या टॅक्सीवाला चित्रपटात झळकली होती. त्या दोघांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटाने प्रियांकाला खूप लोकप्रियता मिळवून दिली. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते.
तर व्यंकटेश अय्यर सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असून आतापर्यंत त्याने कोणतीही खास कामगिरी केलेली नाही. कोलकाता संघाकडून व्यंकटेश फलंदाजीसाठी सलामीला उतरत आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये व्यंकटेशने १६, १० आणि ३ धावा केल्या आहेत.