राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. नेमकं असं काय घडलं
ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडले आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. #janhitwadi