IPS अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकारी म्हणतो…

वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. पुरुषोत्तम शर्मा यांना सध्या विशेष नियुक्ती म्हणून मध्य प्रदेशमधली भोपाळमध्ये पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्यात आलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कायद्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या महासंचालकांचाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शर्मा हे एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील महिलेला शर्मा बेदम मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती शर्मा यांची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये शर्मा या महिलेला मारहाण करतानाच शिवीगाळही करत आहेत.

शर्मा यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेबरोबर (जी त्यांची प्रेयसी असल्याचे सांगण्यात येत आहे) रंगेहाथ पकडल्यानंतर या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. घरी आल्यानंतरही या दोघांमधील वाद अगदी शिगेला पोहचला. त्यामुळेच संतापलेल्या शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करत असतानाच काही जण त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कोणाचेही काहीही न ऐकता शर्मा पत्नीला मारहण करत असल्याचे व्हिडिओत दिसतेय.

शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणारे सर्वजण हे त्यांच्या घरी काम करणारे कर्मचारी आहेत. या प्रकरणामध्ये आता शर्मा यांचा मुलगा पार्थ शर्मा यानेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पित्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पार्थने हा व्हिडिओ पाठवला आहे. पार्थ स्वत: एक आयआरएस अधिकारी आहे. या प्रकरणामध्ये शर्मा यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. आपण पत्नीबरोबरच संबंधांना कंटाळलो आहोत असंही शर्मा यांनी म्हटलं आहे. शर्मा यांनी गुन्हा कबुल केल्याने आता त्याच्याविरोधात राज्य सरकार करावाई करु शकतं असं सांगितलं जातं आहे.

अशाप्रकारे शर्मा वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शर्मा यांच्यावर हनीट्रॅपिंगचे आरोप झाले आहेत. त्यावेळी शर्मा हे दहशतवादी विरोधी पथकाचे महासंचालक होते. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये शर्मा यांचे नाव समोर आल्यानंतर शर्मा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व्ही. के. सिंह यांच्यावरही आरोप केले होते. सिंह हेच आपल्याला या प्रकरणात अडकवत असल्याचा आरोप शर्मा यांनी केलेला. या दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील वाद एवढा विकोपाला गेला होता ती तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांना या प्रकरणात हस्ताक्षेप करावा लागला होता. कमलनाथ यांनी शर्मा यांची बदली केली होती.

Comments : 1


  • - Kisan Chauhan

    Just Awesome

Leave a comment