आपण वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी या निसर्गात पाहत असतो , तर या महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असा ही प्रश्न आपल्याला पडला असेल. हरियाल हा महाराष्ट्रचा राज्य पक्षी आहे..
हरियाल पक्षी हा पावसाळी प्रदेशात जंगलात आढळून येतो. महाराष्ट्रातले पक्षी आनंद सागर शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आढळतो. हा पक्षी यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. महाराष्ट्र बाहेर हा पक्षी मलबार ओरिसा विद्या प्रदेश मध्य प्रदेश या प्रांतात आढळून येतो . हा पक्षी हिमालयातही आढळतो . पण त्याला तिथे कोकिळा म्हणतात . अंदमान निकोबार बेटांवर सुद्धा त्याची जात आहे .
हरियालचे थवे वडाच्या झाडावर बसलेले असतात तसेच ते झाडाला उलटे टांगून फळे खाताना दिसून येतात . दाट पानाच्या फांद्यावर बसले तर ते दिसून येत नाही . हा पक्षी दिसायला कबुतरा सारखा असतो , तर तो पोपटासारखा हिरवागार असतो . त्याच्या शरीरावर जांभळ्या व निळ्या रंगाचे मिश्रण असते हरियाल चे पाय व नख्या ह्या पोपटासारखा असतात . त्यामुळे त्याला पोपटासारखा उलट टांगून फळे खाता येतात.
हरियाल हा पक्षी कबुतरासारखाच घुमतो कधीकधी चिडचिड असा आवाज करत तो फिरत असतो. नर व मादी हरियाल यांच्यात काहीच फरक दिसून येत नाही. या पक्षाची शिकारी मोठ्या प्रमाणात केली जाते. विनीचा हंगाम मार्च ते जून महिना या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यात ते पक्षी अंडे घालतात . मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यात त्यांचा वावर आहे.
हरियाल पक्षी महाराष्ट्र गुजरात बंगाल राजस्थान पंजाब व आसाम येथील अभयारण्यातून दिसून येतो तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथे हरियाल सापडतो. वृक्षतोडीमध्ये हरियाल हा पक्षी आपले मुळची वास्त्याव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतो. त्यांचा अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे या पक्षांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे.