टीम इंडियासाठी धोनीच्या जागेवर ऋषभ पंत हाच योग्य पर्याय !

१५ ऑगस्टला संध्याकाळी महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर सुमारे वर्षभर धोनी भारतीय संघाबाहेर होता. दरम्यानच्या काळात धोनीला संघात स्थान मिळावं यासाठी सोशल मीडियावर जोरदार मागणी होत होती. परंतू निवड समितीने ऋषभ पंतला पाठींबा देत रहायचं ठरवलं. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनीने चेन्नईकडून खेळतो आहे. मात्र एकीकडे संजू सॅमसन, इशान किशन यासारखे यष्टीरक्षक-फलंदाज आश्वासक कामगिरी करत असताना पंतला मात्र मिळत असलेल्या संधीचा फायदा घेता येत नाही. टीम इंडियातही संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी होत असताना संजय बांगर आणि आशिष नेहरा या दोन माजी भारतीय खेळाडूंनी टीम इंडियात धोनीच्या जागेवर ऋषभ पंत हाच उत्तम पर्याय असल्याचं म्हटलंय.

“यष्टीरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझ्या दृष्टीने टीम इंडियात पंत हाच धोनीसाठी उत्तम पर्याय आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ती पाहण्यासारखी आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा विचार करायला गेलं तर मधल्या फळीत एका डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय असणं कधीही चांगलं आहे. यामुळे संघाला स्थैर्य येतं.” टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर Star Sports à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ Cricket Connected à¤•à¤¾à¤°à¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ बोलत होते.

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरानेही बांगर यांचीच री ओढली. “टीम इंडियात धोनीची जागा कोण घेणार याबद्दल बोलत असताना आपण नेमक्या कोणत्या संघाचा विचार करतो हे ठरवायला हवं. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला चांगला यष्टीरक्षक हवा असेल तर कर्णधार आणि प्रशिक्षकांचं काय विचार आहे हे देखील लक्षात घ्यावं लागतं. संजय बांगर यांच्या मताशी मी सहमत आहे. टीम इंडियात पंतला संधी मिळायला हवी.” आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment