मुंबई: चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा आंद्रे रसेल खूप भावुक झाला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळाडू किरोन पोलार्डचा भावुक फोटो समोर आला आहे. मुंबई इंडियन्स संघाने त्याचे काही फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये पोलार्ड झुकलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने मैदानात सामना जिंकल्यानंतर हात जोडून आभार मानले आहेत.
पोलार्डच्या वडिलांचं नुकतंच निधन झाल्याचं समोर आलं होतं. 23 मार्च रोजी वडिलांच्या निधनाची बातमी पोलार्डने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर पोलार्डच्या कष्टाचं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खऱ्या अर्थानं चिज झालं. पोलार्डला यावेळी वडिलांची आठवत आली. त्याने वडिलांचे आणि देवाचे यावेळी मनापासून हात जोडून आभार मानले.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने सर्वाधिक धावा केल्या. 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं त्याने 34 बॉलमध्ये 87 धावा केल्या आहेत. मुंबई संघाला एका बॉलमध्ये जेव्हा शेवटच्या 2 धावांची विजयासाठी आवश्यकता होती. तिथे त्याने दोन धावा धावून काढल्या आणि मुंबई संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई संघाच्या हातून विजय खेचून आणण्यात किरोन पोलार्डचा मोठा वाटा आहे.
मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये हा सामना जिंकल्यानंतरही चौथ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामने गमवाले असून 5 सामने जिंकण्यात यश आलं आहे.