बटलरच्या शतकामुळे राजस्थानचा दणदणीत विजय
जोस बटलरच्या दणके बाज शतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिके ट स्पर्धेत रविवारी सनरायजर्स हैदराबादचा ५५ धावांनी दणदणीत पराभव के ला. डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत नेतृत्वबदल के ल्यानंतरही हैदराबादला सूर गवसला नाही.
बटलर आणि सॅमसनच्या दीडशतकी भागीदारीमुळे राजस्थानने सनरायजर्ससमोर २२१ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. मनीष पांडे (३१) आणि जॉनी बेअरस्टो (३०) यांनी ५७ धावांची सलामी देत आश्वासक सुरुवात के ली. पण वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिझुर रहमान यांच्या भेदक माऱ्यासमोर सनरायजर्सची फलंदाजी कोलमडली. अखेर सनरायजर्सला २० षटकांत ८ बाद १६५ धावाच करता आल्या. मॉरिस आणि रहमान यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
तत्पूर्वी, बटलरच्या शतकामुळे राजस्थान रॉयल्सने सनरायजर्सविरुद्ध ३ बाद २२० धावा उभारल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१२) लवकर माघारी परतल्यानंतर बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी सनरायजर्सच्या गोलंदाजांना भरपूर समाचार घेत दुसऱ्या गडय़ासाठी १५० धावांची भागीदारी रचली.
बटलरने ६४ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांचा पाऊस पाडत १२४ धावांची खेळी साकारली. त्याचे हे ‘आयपीएल’मधील पहिले शतक ठरले. सॅमसनने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ३ बाद २२० (जोस बटलर १२४, संजू सॅमसन ४८; राशिद खान १/२४) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १६५ (मनीष पांडे ३१, जॉनी बेअरस्टो ३०; मुस्तफिझुर रहमान ३/२०, ख्रिस मॉरिस ३/२९)
१२४* चेंडू ६४
चौकार ११
षटकार ८ जोस बटलर
वॉर्नरला डच्चू
सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून डच्चू देण्यात आला. हैदराबादला सहा सामन्यांत एकच विजय मिळवता आला असून आता केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली विजयाची गाडी रुळावर आणण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र वॉर्नरला वगळण्याच्या निर्णयाचे सनरायजर्सचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी समर्थन केले आहे. संघाचा समतोल राखण्यासाठीच वॉर्नरला विश्रांती देण्यात आली, असे मूडी यांनी म्हटले
आहे.