मुंबई: दिल्ली विरुद्ध पंजाब सामना नुकताच नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने पंजाबवर विजय मिळवला आहे. दिल्लीसाठी हा विजय मिळवणं अगदीच सोपं होतं. याचं कारण म्हणजे पंजाब संघाचा सर्वात तगडा खेळाडू के एल राहुल मैदानात उतरला नव्हता. ऋषभ पंतच्या संघाने पंजाबवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
के एल राहुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अग्रवालकडे सोपवण्यात आली होती. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पंजाब संघात मयंक अग्रवालने सर्वात जास्त धावा केल्या. 58 चेंडूमध्ये त्याने 99 धावा केल्या मात्र त्याचं शतक हुकलं.
डेव्हिड मलानने 26 धावा केल्या तर ख्रिस गेल 13 धावा करून संघात परतला आहे. पंजाब संघाने 6 गडी गमावून 166 धावा केल्या तर दिल्ली संघाला 167 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
दिल्ली संघामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉने 39 धावा तर शिखरने 69 धावा केल्या. स्टीव स्मिथने 24 तर पंतने 14 धावांची खेळी केली. शिमरोनने 16 धावा केल्या आणि दिल्ली संघाने पंजाबवर विजय मिळवला आहे.