मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थातचं अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुहाना खानने आता वयाच्या 21 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सुहाना 21 वर्षांची होताचं तिला एका व्यक्तीने लग्नाची मागणी घातली आहे. त्या व्यक्तीने गौरी खानकडे सुहानासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
दरम्यान, सुहानाने तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. सोशल मीडियावर तिला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका चाहत्याने तर तिला थेट लग्नासाठी विचारलं. गौरी खानने सुहानाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
तेव्हा ट्विटरवर एका युझरने कमेन्टमध्ये लिहिलं की, 'गौरी मॅम माझं लग्न सुहानासोबत करून द्या. मी महिन्याला 1 लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे कमवतो.' गौरी खानने शेअर केलेल्या पोस्टवर युझरने केलेली कमेन्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CPM9T4LHN9F/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान सुहानाने 21व्या वर्षात पदार्पण करताचं एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो सध्या सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सुहाने पोस्टर ग्रीन रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं.