टीम इंडियाचे क्रिकेटपटू आपल्या विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. नव्या जाहिराती, नवे लूक्स या गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक क्रिकेटपटू आपल्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूने बॉलिवूड चित्रपट गजनी फेम आमिर खानची हेअरस्टाईल केली आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आणि टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहरने गजनी हेअरस्टाईल केली आहे. चहरने इन्स्टाग्रामवरून आपले नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले. या लूकमध्ये तो एकदम खतरनाक दिसत आहे. अनेकांनी त्याला या लूकरवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याला बाहुलबलीचा खलनायक असेही म्हटले.