मुंबई, 19 सप्टेंबर : तब्बल साडेचार महिन्यानंतर आयपीएल स्पर्धा (IPL 2021) पुन्हा एकदा सुरु होत आहे. यापूर्वी या स्पर्धेचा पहिला टप्पा भारतामध्ये झाला होता. त्यावेळी बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आयपीएल स्पर्धेचा पहिल्या टप्प्यामध्ये 29 मॅच झाल्या. 2 मे रोजी पहिल्या टप्प्यातील शेवटची मॅच पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात झाली होती. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्या लढतीनं आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.
पहिल्या टप्प्यात काय घडलं?
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर होती. दिल्लीनं 8 मॅचमध्ये 6 विजय आणि 2 पराभवासह 12 पॉईंट्सची कमाई केली आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 मॅचनंतर 5 विजयासह 10 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) देखील 7 मॅचनंतर 10 पॉईंट्स आहेत. पण त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा कमी असल्यानं ही टीम तिसऱ्या नंबरवर आहे. तर मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 7 मॅचमध्ये 4 विजय आणि 3 पराभवासह 8 पॉईंट्स कमावले असून ही टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
आजचा विजय ठरणार गेमचेंजर
मुंबईची संभाव्य टीम
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जेम्स नीशम/नॅथन कुल्टर-नाइल/ एडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
चेन्नईची संभाव्य टीम
ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जॉस हेजलवूड/लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर