मुंबई, 20 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) यूएईमध्ये सुरू झाला आहे. या टप्प्यात क्रिकेट फॅन्सचं ही मैदानात आगमन झालं आहे. भारतामध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 29 सामने झाले होते. आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. आता प्रत्येत सामन्यानंतर आयपीएलच्या 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस वाढणार आहे. जगभरातील क्रिकेट फॅन्स सध्या आयपीएलचा आनंद घेत आहेत. पण अफगाणिस्तानचे फॅन्स आयपीएलचे सामने लाईव्ह पाहू शकणार नाहीत.तालिबानचा (Taliban) नवा कायदा याचं कारण आहे. याबाबत मीडिया रिपोर्टनुसार इस्लाम विरोधी कंटेट असल्याचा दावा करत अफगाणिस्तानमध्ये आयपीएल 2021 च्या ब्रॉडकास्टिंगला बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलमुळे श्रद्धेला धक्का बसतो असा दावा तालिबानच्या राजवटीनं केला आहे.
सीएसकेनं जिंकला पहिला सामना आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) मुंबई इंडियन्सचा 20 रननं पराभव केला.चेन्नईने ठेवलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 136 एवढाच स्कोअर करता आला. सौरभ तिवारीने (Saurabh Tiwary) सर्वाधिक नाबाद 50 रन केले. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीपासूनच वारंवार धक्के लागले. चेन्नईकडून ड्वॅन ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला 2 विकेट मिळाल्या.जॉश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2021: मुंबईवरील विजयानंतर धोनी खूश, 'या' 2 खेळाडूंना दिलं श्रेय त्याआधी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपरकिंग्सडून दमदार खेळ केला. ऋतुराजने 58 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 88 रनच्या खेळीमुळे चेन्नईला 156/6 पर्यंत मजल मारता आली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या चेन्नईची सुरुवात (MI vs CSK) अत्यंत खराब झाली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरला ट्रेन्ट बोल्टने त्यांना धक्का दिला, यानंतर पुढच्याच ओव्हरला एडम मिल्ने यानेही विकेट घेतली. सचिनच्या पावलावर विराटचं पाऊल, 3 दिवसांमध्ये घेतले 2 मोठे निर्णय चेन्नईची अवस्था 4 आऊट 24 अशी होती आणि अंबाती रायुडू दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला होता, पण ऋतुराजने रवींद्र जडेजा आणि मग ड्वॅन ब्राव्होच्या मदतीने चेन्नईला सावरलं. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.