मुंबई, 22 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आरसीबी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच कर्णधारपदावरुन हटवले जाऊ शकते. एका माजी भारतीय क्रिकेटपटूनं ही माहिती दिली आहे. अबू धाबीमध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (RCB vs KKR) आरसीबीचा मोठा पराभव झाला. या मोठ्या पराभवानंतर विराटला स्पर्धेच्या दरम्यानच कर्णधारपदावरुन हटवले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या आयपीएल स्पर्धेतनंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीनं यापूर्वीच जाहीर केला आहे.आपण पुढील आयपीएलपासून एक बॅट्समन म्हणून आरसीबीकडून खेळणार असल्याचं विराटनं जाहीर केलं आहे. पहिल्या बॅटीगसाठी उतरलेली आरसीबीची टीम कोलकाता विरुद्ध फक्त 92 रन वर ऑल आऊट झाली. विराट या मॅचमध्ये फक्त 5 रन काढून आऊट झाला. त्याला प्रसिद्ध कृष्णानं आऊट केलं. कृष्णाच्या आतमध्ये येणाऱ्या बॉलवर विराट फसला. अंपायरनं आऊट दिल्यानंतर विराटनं रिव्ह्यू देखील घेतला, पण त्याचा काही फायदा झाला नाही.