मुंबई, 23 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात लढत होत आहे. मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात खराब झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध (CSK) त्यांचा पराभव झाला. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) मोठा पराभव करत जोरदार सुरूवात केली आहे. मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या चौथ्या तर कोलकाताची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. आता आयपीएलमधील प्रत्येत मॅच महत्त्वाची आहे.त्यामुळे दोन्ही टीमना या मॅचमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. या मॅचपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) त्यांच्या अधिकृत हँडलवरुन मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) एक गमतीशीर सल्ला दिला असून तो आता व्हायरल झाला आहे. 'रोहित शर्मा आणखी एक मॅच विश्रांती घेतलीस तर तुझं काही नुकसान होणार नाही. टी20 वर्ल्ड कप जवळ येत आहे.' असं ट्विट केकेआरनं केलं असून त्यामध्ये रोहितला टॅग केलं आहे.
रोहितचा जबरदस्त रेकॉर्ड आहे कारण केकेआरनं रोहितला हे ट्विट केल्याचं कारण म्हणजे त्याचा या टीमविरुद्ध असलेला जबरदस्त रेकॉर्ड आहे. केकेआर विरुद्ध 1000 रन करण्यासाठी रोहितला आता आणखी 18 रनची आवश्यकता आहे. त्यानं आजवर केकेआरविरुद्ध 28 मॅचमध्ये 46.76 च्या सरासरीनं 982 रन केले आहेत. यामध्ये 6 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे.तसंच त्याचा केकेआर विरुद्धचा स्ट्राईक रेट 133.06 इतका आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा रेकॉर्डही खूप खराब आहे. कोलकातानं मुंबई विरुद्ध शेवटच्या 13 पैकी 12 मॅच गमावल्या आहेत. त्यामुळेच केकेआरनं हे गमतीशीर ट्विट रोहितला उद्देशून केलं आहे. रोहित-हार्दिक कोलकात्याविरुद्ध खेळणार का नाही? मोठी Update मुंबईची टीम रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स नीशाम, जयंत यादव, कायरन पोलार्ड , मार्को जेनसन, युद्धवीर सिंग, एडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, पियुष चावला, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट 'देवाशी कोण बोलतं...' रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक! कोलकाताची टीम इयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंग मान, करुण नायर, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, एम प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर , शिवम दुबे, टीम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टीम सायफर्ट