चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी २० स्पर्धेत ३०० व्या सामन्याचं महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत आहे. धोनी २००७ पासून टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स, इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघाचं नेतृत्व केलं आहे.
धोनीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २९९ सामन्यापैकी १७६ सामन्यात विजय, तर ११८ सामन्यात पराभव सहन केला आहे. तर तीन सामन्याचा निकाल लागला नाही. धोनीच्या नेतृत्वात जिंकण्याची क्षमता ५९.७९ टक्के आहे. “आपण २००५-०६च्या सुमारास टी-२० क्रिकेटला सुरुवात केली. बहुतेक सामने फ्रेंचायझी क्रिकेटचे होते आणि गेल्या पाच वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बरेच टी-२० सामने झाले आहेत”, असे टॉसच्या वेळी धोनीने सांगितले.
जेतेपदांमध्ये चेन्नई आघाडीवर, पण…चेन्नईने २०१०,२०११ आणि २०१८ मध्ये जेतेपद जिंकले आहे. तर २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८, २०१९ आणि २०२१ अंतिम फेरी गाठलीय. कोलकात्याच्या संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेदपावर नाव कोरलं आहे. २०१२ मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत केलं होतं. हा कोलकात्याचा तिसरा अंतिम सामना ठरणार आहे.