चेन्नई: पुढच्या दोन दिवसात 12 आणि 13 फेब्रुवारीला IPL च्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lcuknow super giants) आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांमुळे IPL ऑक्शन अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. या मेगा ऑक्शनसाठी सर्वच फ्रेंचायजींनी तयारी केली आहे. प्रत्येक संघाची रणनिती ठरली आहे. प्रत्येक फ्रेंचायजीला चार खेळाडू रिटेन करता आले आहेत. त्यामुळे अनेक युवा टॅलेंटेड खेळाडू ऑक्शनसाठी उपलब्ध आहेत. एकूण 590 खेळाडू Mega Auction मध्ये आहेत. जुन्या खेळाडूंना पुन्हा संघासोबत जोडण्याचा प्रयत्न होईल. खासकरुन CSK आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्याचा अन्य फ्रेंचायजींचा प्रयत्न असेल. कारण आयपीएलमधील हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत.
CSK साठी त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहेया ऑक्शनमध्ये एका स्टार फलंदाजाचा आपल्या जुन्या संघाकडून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न असेल. हा स्टार खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्यूप्लेसिस. मागच्या काही वर्षांपासून फाफ ड्यूप्लेसिस CSK साठी महत्त्वाची खेळाडू राहिला आहे. 2021 मध्ये CSK ने IPL चे जेतेपद पटकावलं, त्यात फाफ ड्यूप्लेसिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता.
मागच्यावेळी फक्त 1.5 कोटीमध्ये विकत घेतलंभारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या मते ड्यूप्लेसिस सारख्या खेळाडूला आपल्या चमूत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसू शकते. स्वत: अश्विनही मेगा ऑक्शनमध्ये आहे. “मागच्यावेळी सीएसकेने फाफ ड्यूप्लेसिस फक्त 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण आता तसंच होईल, असं वाटत नाही. सीएसकेच्या चाहत्यांना नक्कीच तो आपल्या संघात हवा असेल. यावेळी सीएसकेला ड्यूप्लेसिसला विकत घ्यायचे असेल, तर त्यांना मागच्यावेळपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. माझ्या मते फाफ ड्यूप्लेसिस सारख्या खेळाडूला संघात घेण्यासाठी मोठी चुरस दिसेल” असे अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.
मेगा ऑक्शनआधी सीएसकेने रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मोइन अली आणि ऋतुराज गायकवाड या चौघांना रिटेन केलं आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने आतापर्यंत चार जेतेपद पटाकवली आहे.