मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) ही स्पर्धा काही दिवसात सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेतला पहिला सामना सध्याचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे आयपीएलचे आयोजन महाराष्ट्रातच करण्यात आले आहे. मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जातील, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या सामन्यांचे आयोजन करेल. यंदादेखील आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळेल. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप (Orange Cap) दिली जाते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ही कॅप तीनदा पटकावली आहे.
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्याची पद्धत स्पर्धेच्या पहिल्या सत्रापासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरने ही कॅप सर्वाधिक तीन वेळा जिंकली आहे. त्याच्यानंतर यादीत ख्रिस गेलचे नाव आहे. गेलने ही कॅप दोनदा जिंकली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी ही कॅप जिंकली आहे.