मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये बरंच काही बदललं आहे. CSK च्या कर्णधाराबाबत नवा बदल झाला आहे. एमएस धोनीच्या जागी आता रवींद्र जडेजा संघाचा नवा कर्णधार आहे. आणि, आज या नव्या भूमिकेतील त्याची पहिली परीक्षा आहे. आता जडेजाच्या कर्णधारपदाची चुणूक तो या चाचणीत उत्तीर्ण झाल्यावरच पाहायला मिळेल, जेव्हा वानखेडेवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव करेल. अशा स्थितीत चेन्नईचा हा 36 वर्षीय खेळाडू जडेजासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. कारण तो वानखेडेच्या खेळपट्टीवर नेहमीच धमाका करतो.
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा 36 वर्षीय खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अंबाती रायुडू हा आहे. रायुडू मधल्या फळीतील फलंदाज आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात रायुडू चेन्नईचे महत्त्वाचे अस्त्र ठरू शकते. कारण वानखेडे हे त्याचं आवडतं मैदान आहे.
अंबाती रायडूने वानखेडेवर खेळल्या गेलेल्या 48 डावांमध्ये 126.79 च्या स्ट्राइक रेटने 885 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 अर्धशतके, 78 चौकार आणि 35 षटकार ठोकले आहेत. 59 धावा ही रायुडूची वानखेडेवरील सर्वोत्तम धावसंख्या आहे. या मैदानात रोहितने 61 डावात 1733 धावा केल्या आहेत, तर पोलार्डने 56 डावात 1207 धावा केल्या आहेत. केकेआरच्या संघातील एकही फलंदाज वानखेडेवर सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाचमध्येही नाही.
अंबाती रायुडूला 175 आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलच्या खेळपट्टीवर खेळलेल्या 164 डावांमध्ये त्याने 3916 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 127.47 इतका आहे आणि त्याच्या बॅटने एका शतकाव्यतिरिक्त 21 अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या 3916 धावांपैकी 885 धावा रायुडूने फक्त वानखेडेवर केल्या आहेत, यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता की रायुडू वानखेडेच्या मैदानावर किती खतरनाक खेळाडू आहे याचा.