मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचे अवेकवेळा ब्रेकअपदेखील होतात. यातील एक म्हणजे नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची लव्हस्टोरी. मनीषा आणि नानांच्या ब्रेकअपच्या चर्चा कायम चर्चेत असतात.. ज्या प्रकारे दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्याचा शेवटही तितकाच वाईट झाला
एक काळ असा होता की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्यात अशी एक गोष्टी घडली की त्यांचं प्रेम कायमचं संपलं. आज आम्ही तुम्हाला या दोघांची ब्रेकअप स्टोरी सांगणार आहोत
दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झालीअसं म्हणतात की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी 'अग्निसाक्षी' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या सिनेमांत दोघांमध्ये खूप चांगली मैत्री बनली होती आणि त्यांची जवळिकतेचं रूपांतर प्रेमात झालं होतं. यावेळी मनीषा नानांपेक्षा 20 वर्षांनी लहान होती.