मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या चर्चा आजही रंगत असतात. अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी तिच्या बॉयफ्रेन्डमुळे तर कधी तिच्या दोन मुलींमुळे. पण आता सुष्मिता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सुष्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने 45 वर्षांपर्यंत केलेल्या चुकांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने तिला सतत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे.
https://www.instagram.com/p/CPTe4L_t2GP/
सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'लोक कायम मला विचारत असतात मी सुट्टी घेत नाही का? मी सुट्ट्या घेते.' त्यानंतर सुष्मिता म्हणते, 'तू कायम पॉझिटीव्ह असते? तर माझं उत्तर आहे नाही... मी कायम पॉझिटीव्ह राहण्याचा विचार करते पण तसं होत नाही. वयाच्या 45 व्या वर्षीही माझ्या काही गोष्टींच्या निवडीमध्ये मोठ्या चुका झाल्या आहेत. त्याचं मला फार दुःख होतं.
दरम्यान, मिस यूनिवर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) खूप दिवसांपासून सिल्वर स्कि्रिनपासून दूर आहे. मात्र असं असलं तरीही सुष्मिता कधी तिच्या रिलेशनशिपमुळे तर कधी फिटनेसमुळे चर्चेत राहते. 1994 मध्ये सुष्मिता सेन मिस युनिवर्स झाली. ज्यानंतर तिला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स आल्या. 1996 मधून सुष्मिताने फिल्मी करिअरला 'दस्तक' चित्रपटातून सुरूवात केली.