करोना काळात अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम करतं आहेत. घरून काम करत असल्यामुळे अनेकांना नेहमी पेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. या सगळ्याचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होतो. त्यासाठी आपल्याला डोळ्यांचा व्यायाम करणे गरजेचे आहे. ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने डोळ्यांचे काही व्यायाम सांगितले आहेत.
आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने डोळ्यांसाठी एक व्यायाम सांगितला आहे. हाताची दोन बोटं घ्या आणि डोळ्यांवर ठेवून एकदा बाहेरच्या बाजूला आणि एकदा आतल्या बाजूला फिरवा. “वर्क फ्रॉम होम! हा डिजिटल जगाचा आशीर्वाद आह की उपहास आहे? बरं. आपल्या डोळ्यांवर तरी कमीतकमी याचा तणाव होतो, आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन अ ची गरज असते,” असे भाग्यश्री म्हणाली.
https://www.instagram.com/p/CP2ikooH9h6/
पुढे भाग्यश्री म्हणाली, “गाजर, हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन अ सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. परंतु आपल्या वाढणाऱ्या वयामुळे आणि डिजिटल गोष्टींचा अतिरिक्त वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांची क्षमता कमी होते. आपले डोळे मजबूत, तेजस्वी राहण्यासाठी हा व्यायाम नक्कीच करा.”
आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य
भाग्यश्रीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती त्यांच्या संपर्कात राहते. भाग्यश्रीने पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांसाठी हेल्थ टिप्स दिलेल्या नाहीत. या आधी देखील तिने बऱ्याच वेळा तिच्या चाहत्यांना अनेक टिप्स दिल्या आहेत. भाग्यश्री वर्क आऊट करण्याच्या अनेक टिप्स देखील देताना दिसते.