Raj Kundra Whatsapp Chat : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली आहे. पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्या ठपका व्यावसायिक राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे. यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यानुसार, कदाचित आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल राज कुंद्रा यांना आधीच लागली होती. पुढच्या दिवसांत आपण भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ शकतो, याची कुणकुण लागल्यामुळेच राज कुंद्रानं 'प्लान बी' तयार केला होता.
तपासादरम्यान, क्राईम ब्रांचच्या हाती लागलेलं व्हॉट्सअॅप चॅटवरुन राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा होतो. तपासादरम्यान, राज कुंद्राच्या माजी पीए उमेश कामतच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या मोबाईलमध्ये अनेक असे चॅट्स समोर आले आहेत. जे राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा करतात.
असा आहे राज कुंद्राचा प्लान बी
एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, "एच अकाउंट्स" नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्शीने हॉटशॉट अॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं रिप्लाय दिला की, "काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवं अॅप्लिकेशन लाईव्ह होईल."
राज कुंद्रा आणि पीए कामतचं व्हॉट्सअॅप चॅट :
पॉर्न इंडस्ट्रीला नवी दिशा देण्याची प्लानिंग
राज कुंद्राचा प्लान बी म्हणजे, बोलिफेम. हा प्लान राज कुंद्रानं तयार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी राज कुंद्रानं हा प्लान तयार केला होता. यादरम्यान, कामत आणि राज कुंद्रा या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आलं, ज्यामध्ये राज कुंद्राने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठवलं, या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, "पॉर्न व्हिडीओ 7 ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलीस 7 ओटीटी मालकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे."
राज कुंद्रा आणि उमेश कामत यांच्याती व्हॉट्सअॅप चॅट :
राज कुंद्रा : खूपच चांगलं झालं की, आपण बोलिफेमची तयारी केली. उमेश कामत : आपण ऑफिसमध्ये येऊन यावर चर्चा करु. तोपर्यंत आपल्याला सगळे बोल्ड कंटेंट हटवले पाहिजे. राज कुंद्रा : मला शंका आहे की, ते लोक ऑल्ट बालाजीचा कंटेंट हटवतील उमेश कामत : हे एवढं गंभीर नाही. ते केवळ ओबजेक्शनेवल कंटेंट काढून टाकण्यासाठी सांगतिल.
लाईव्ह कंटेंट भविष्य
राज कुंद्रा चॅटमध्ये असं बोलताना दिसतो की, येणाऱ्या काळात भविष्य लाईव्ह कंटेंटचा आहे. कारण स्क्रिन रेकॉर्डिंग शक्य नाही. क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा पॉर्न शूट थांबवून मॉडेल आणि अभिनेत्रींना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची तयारी करत होता. हिच लाईव्ह स्ट्रिम करण्यासाठी बोलिफेमची तयारी केली जात होती.
अशी झाली राज कुंद्राची पोल-खोल?
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि अन्य काही लोकांविरोधात एका महिलेने मुंबई पोलिसांकडे या संबंधी एक गुन्हा दाखल केला होता. राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांनी वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली आणि जबरदस्तीने पॉर्न चित्रपट बनवले असा आरोप त्या महिलेने केला आहे. या पॉर्न रॅकेटचा मास्टरमाईंड हा राज कुंद्रा आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये केंद्रीन नावाच्या एका कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. ही कंपनी ओटीपी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट पब्लिश करायची. या कंपनीची निर्मीती राज कुंद्राने केली होती. भारतातील सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी त्याने ब्रिटनमध्ये या कंपनीचे रजिस्ट्रेशन केलं होतं. राज कुंद्राच्या परिवारातील अनेक सदस्य या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि देशातील इतर ठिकाणी शूट करण्यात आलेले पॉर्न मटेरियल अपलोड करण्यात यायचे.
राज कुंद्राची 10 कोटी रुपयांची गुंतवणूक
राज कुंद्राने या कंपनीमध्ये 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं क्राईम ब्रॅन्चने स्पष्ट केलं आहे. फेब्रुवारी महिन्यातच कुंद्रा याचा या कंपनीशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं होतं. उमेश कामत नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि तो राज कुंद्रापर्यंत येऊन पोहोचला.