आपण जेव्हा कपाटा समोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात हाच विचार येतो की आज आपण कोणता ड्रेस घालावा ? काय करावं ? आपण नेहमीच आज माझ्याकडे कपडेच नाहीत ? असा नारा लावलेला असतो. त्या अभिनेत्री आहेत ज्या आपल्याला ट्रेंड सांगतात, आपल्याला सुचवतात की कोणते कपडे घालायचे आणि कोणते नाही. चला तर बघूयात कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यांनी अल्टिमेट फॅशन गोल्स सेट केले आहेत. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नेहमीच फॅशन गोल्स् देत असते. तिचा काळ्या रंगाचा क्रॉसएट गाऊन तिच्यावर अप्रतिम शोभत आहे. (Photo-Official Instagram)
सारा अली खान इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत होती. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच छान छान ड्रेस परिधान करताना दिसते. यावेळे तिचा निळ्या रंगाचा स्वेटर जॅकेट , निळ्या रंगाची पॅन्ट आणि तिचा कातीलना अंदाज हे सगळं मिळून तिचा या लुकला चार चाँद लावत आहेत. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री मलायका अरोराचा हा लुक तुम्ही नक्कीच आवडेल. तिने पांढरा फॉर्मल शर्ट आणि त्याला साजेशी पॅन्ट परिधान केली आहे. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या इंग्लडमध्ये पती सोबत एंजॉय करताना दिसत आहे. तिने शेअर केलेला कॅज्यूअल अंदाजातला हा फोटो पाहून तुम्ही पण म्हणाल कपडे परिधान करावे तर असे. अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाच जॅकेट परिधान केलेल असून त्या शर्टाला साजेल अशी निळ्या रंगाची डेनिम परिधान केली होती. (Photo-Official Instagram)