भारतात ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमााने साजरा केला जात आहे. निळ्या आकाशात फडकणारा भारताचा तिरंगा पाहून प्रत्येकाचं उर भरून येतं. दिमाखात फडकणारा तिरंगा आणि कानावर पडणारे देशभक्तीपर गीतांचे बोल ऐकून प्रत्येकाच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. जसं प्रत्येक सणाला बॉलिवूडमधील गाण्यानी चार चांद लागतात त्याचप्रकारे स्वतंत्र्यदिनाच्या निमित्तानेदेखील बॉलिवूडमधील अनेक देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते. आजच्या या खास दिवसाच्या निमित्ताने आपण बॉलिवूडमधील लोकप्रिय ठरलेली देशभक्तीपर गाणी कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.
केसरी (२०१९): ‘तेरी मिट्टी’अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या सिनेमातील ‘तेरी मीट्टी’ हे गाणं एका सैनिकाच्या मनात असलेल्या देशप्रेमाचं वर्णन करणारं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. प्रतीक बच्चन म्हणजेच बी प्राकने हे गाणं गायलं आहे. ‘केसरी’ हा सिनेमा १८८७ सालामधील सारागढीच्या लढाईवर आधारित आहे.
मणिकर्णिका (२०१९): ‘विजय भव’‘मणिकर्णिका’ सिनेमातील ‘विजय भव’ हे गाणं देखील झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या विजयाची गाथा सांगणार आहे. प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे.
उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९): ‘मे लढ जाना’विकी कौशलचा लोकप्रिय ठरलेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक ‘ या सिनेमातील ‘मे लढ जाना’ या गाण्यात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांची मेहनत पाहायला मिळते. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा 2016 मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या सर्जिकल हल्ल्यावर आधारित आहे.
राजी (२०१८): ‘ऐ वतन’‘राजी’ सिनेमातील ‘ऐ वतन’ हे गाण दोन व्हर्जनमध्ये ऐकायला मिळत. अरिजीत सिंह आणि सुनिधी चौहान दोघांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं असून हे गाणं अंगावर रोमांच उभे करणारं आहे.
परमाणू( २०१८)- ‘थारे वासते’सिनेमातील या गाण्यात भारतीय नौदलाला एक मोहिमेदरम्यान आलेल्या अडचणींचं चित्रण करण्यात आलंय. दिव्याकुमार खोसलाने गायलेलं हे गाणं सचिन जीगरने संगीतबद्ध केलंय. भारत सरकारने १९९८ सालामध्ये पोखरणमध्ये केलेल्या अणु चाचण्यांवर हा सिनेमा आधारित आहे.
एअरलिफ्ट (२०१६)- ‘तू भूला जैसै’एअरलिफ्ट या सिनेमातील या गाण्यात अडचणींच्या काळात भारतीयंमध्ये असलेल्या एकीचं चित्रण करण्यात आलंय. या गाण्याच्या शेवटी असलेले ‘वंदे मातरम्’ हे बोल ह्रदयाला भिडणारे आहेत.
वीर झारा (२०१२): ‘ऐसा देस है मेरा’
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं भारत देशाच्या समृद्धीचं वर्णन करणारं आहे. भारताची परंपरा, भारताचं वैविध्य या गाण्यातून मांडण्यात आलंय.
द लेजंड ऑफ भगत सिंग (२०११): ‘मेरा रंगदे बसंती’अजय देवगणच्या शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ या सिनेमातील ‘मेरा रंगदे बसंती’ हे गाणं देशासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीरांना समर्पित आहे. देशासाठी आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या शहिद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शौर्यचं चित्रण या
यासोबतच बॉर्डर सिनेमातील ‘हिंदूस्तान हिदूस्तान’ हे गाणं, परदेश सिनेमातील ‘आय लव्ह माय इंडिया’ ही गाणीदेखील चांगलीच लोकप्रिय ठरली असून देशभक्तीची भावना जागृत करणाऱी आहे.