‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठला फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास चार महिन्यांनंतर गहनाची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपट प्रकरणी अटक झाली. गहनाने राजला सोशल मीडिया पोस्टद्वारे अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. तसेच गहना सोशल मीडिया पोस्टद्वारे सतत मुंबई पोलिसांवर निशाणा साधताना दिसते.
नुकतीच गहनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पोलिसांनी ही दुर्दशा केली आहे. माझे सर्व अकाऊंट ताब्यात घेतले आहेत. माझ्याकडे पैसे देखील नाहीत. स्वत:च्या घरी जाऊ शकत नाही. आणि मी घरी गेले तर पोलीस मला अटक करतील. माझा मोबाईल, लॅपटॉप सर्व काही घेतले आहे. गेल्यावेळी जामिनसाठी कार गहाण ठेवली होती’ असे गहनाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे ती म्हणाली, ‘काही अज्ञात लोकांसोबत राहत आहे. एका घरावर काही लोकांनी कब्जा केला आहे. वकिलांना द्यावी लागणारी फी मी कशी तरी मॅनेज केली आहे. मुंबई पोलीस यापेक्षा जास्त कोणाचे नुकसान कराल का?’ तिने या पोस्टमध्ये हॅशटॅग मुंबई पोलीस हा देखील वापरला आहे.
यापूर्वी गहनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लाईव्हद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नाही आणि न्यूड आहे, असा दावा तिने केला होता. ‘मी घाणेरडी दिसते का? हे पॉर्न आहे का? असे अनेक प्रश्न तिने लाईव्हच्या माध्यमातून विचारले होते.