संपूर्ण देश आज कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करत आहे. लड्डू गोपाळची आज लोकांच्या घरी मोठ्या प्रमाणात सेवा केली जाणार आहे. एखादा सण आहे आणि गोकुळधामच्या लोकांनी तो सण साजरा केला नाही, असं कधी होईल का? पहायला गेलं तर तसं गोकुळधाममध्ये अनेक जन्माष्टमी साजऱ्या करण्यात आल्या आहेत. पण या मालिकेतील एक जन्माष्टमी आजही लोक विसरले नाहीत. साक्षात कृष्ण स्वतः चालत या गोकुळधाम सोसायटीत आले होते आणि एक अशक्य काम शक्य करून दाखवलं.
टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा लोकांचा आवडता कॉमेडी शो आहे. लोक या शोमधील प्रत्येक पात्रावर भरपूर प्रेम करतात. या शोच्या लोकप्रियतेचे एक मोठं कारण म्हणजे शोमधील पात्र. यातील पात्र हे अशा समस्यांमध्ये अडकतात ज्याचा सामना अगदी सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात करावा लागतो. या मालिकेतील प्रत्येकजण त्यांच्यावरील अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येतात, हे लोकांना खूपच आकर्षित करत असतं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका जुन्या भागात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गोकुळधाम सोसायटीत दहीहंडीची एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. पण ही दहीहंडी इतकी उंच होती की कोणीही ती हंडी फोडू शकलं नाही. त्या दहीहंडीला कुणी हात देखील लावू शकलं नाही. हे पाहून गोकुळधाम सोसायटीतील सर्व रहिवासी चिंतेत पडतात. दहीहंडी कशी फोडता येईल, याचा विचार करत सर्व रहिवासी करत असतात. इतक्यात एका लहान मुलाची या गोकुळधाम सोसायटीत एन्ट्री होते. हा चिमुकला दयाळूपणाने दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी मागतो.
गोकुधाम सोसायटीत स्वतःहून चालत आलेला हा मुलगा दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी मागत असतो. पण गोकुळधाम सोसायटीत कुणीही त्याला परवानगी देत नाही. परंतू त्या लहान मुलाचा आत्मविश्वास पाहून जर हा लहान मुलगा म्हणतोय तर तो दहीहंडी फोडू शकतो, असं सर्वांना वाटतं. गोकुळधाम सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी मिळाल्यानंतर हा लहान मुलगा दहीहंडी फोडण्यासाठी वर चढतो आणि पुढे जे काही होतं ते पाहून सारेच जण थक्क होतात. ज्या दहीहंडी फोडण्यासाठी गोकुळधाम सोसायटीतील सारेच जण प्रयत्न करूनही अयशस्वी ठरत होते, त्या उंच दहीहंडीला लहान मुलीने सहज स्पर्श केला. हे पाहून त्या लहान बालकामध्ये गोकुळधाम वासियांना कृष्ण दिसू लागला. हे दृश्य़ पाहून सर्व गोकुळधामवासिय आश्चर्यचकित झाले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधल्या गोकुळधाम सोसायटीत नेहमीच कोणते ना कोणते चमत्कार घडत असतात. हेच छोटे-मोठे चमत्कार प्रेक्षकांना या मालिकेसाठी आकर्षित करत असतात. याच कारणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.