मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्च्याया आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.
सिद्धार्थची कारकीर्द
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो 'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3', 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक'मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या 'बाबुल का आंगन छुटे ना' या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सिद्धार्थ आणि शहनाजची हिट जोडी
कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस 13 (Bigg Boss 13) या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांची जोडी चांगलीच गाजली होती. या शोमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते. नुकतंच, सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत धमाल मस्ती केली होती.