अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या उपचारही सुरू होते. आज त्यांचे निधन झाले. आपल्या आईच्या जाण्याने अक्षय खूप दुःखी झाला आहे. सर्व चाहत्यांनी प्रार्थना केल्याबद्दल त्याने आभारही मानले आहेत.