मुंबई : यात शंका नाही की कंगना रनौत (Kangana Ranaut) एक शक्तिशाली बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक प्रसंगी ते सिद्धही केलं आहे. राजकीय झुकाव आणि धाडसी विचारांमुळे, कंगनाला एका मोठ्या गटाकडून टीकेला सामोरं जावं लागतं आणि सध्या ती तिच्या आगामी थलायवी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
'थलायवी' या चित्रपटात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारत आहे. अभिनय विश्वातून राजकारणात उच्च स्थान मिळवलेल्या जयललिता यांची इच्छा होती की जेव्हाही त्यांचा बायोपिक बनेल तेव्हा बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीनं हे पात्र साकारलं पाहिजे, हे सुप्रसिद्ध होस्ट सिमी ग्रेवाल यांनी उघड केलं होतं.
जयललिता यांना त्यांच्या बायोपिकमध्ये ऐश्वर्या बच्चनला पाहायचं होतं
नुकतंच, मुंबईमध्ये थलायवी चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं, ज्यात सिमी ग्रेवाल व्यतिरिक्त, अनेक बी-टाऊन सेलेब्स देखील पोहोचले होते. स्क्रीनिंगनंतर सिमी ग्रेवाल यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक केलं. यासोबतच जयललिता यांच्याशी संबंधित एक खुलासाही करण्यात आला आहे. सिमीनं सांगितले की, जयललिता यांना ऐश्वर्या राय बच्चननं त्यांचे पात्र साकारावं अशी इच्छा होती.
पाहा ट्विट
सिमी ग्रेवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की मी कंगनाच्या मूलगामी वाक्यांना समर्थन देत नसले तरी मी तिच्या अभिनय प्रतिभेनं समर्थन करते. थलायवीमध्ये तिनं सुंदर काम केलं आहे. ऐश्वर्या राय बच्चननं जयललिता यांचं पात्र साकारावे अशी जया जींची इच्छा होती मात्र माझा अंदाज असा आहे की जया जींनी कंगनाचं पात्र मान्य केलं असतं. जोपर्यंत अरविंद स्वामींचा संबंध आहे, तो एमजीआरचा अवतार आहे.
सर्वत्र कंगनाचं कौतुक
जर सिमी ग्रेवाल कंगनाचं कौतुक करत असेल तर साहजिकच कंगनानं चित्रपटात खूप छान काम केलं आहे. थलायवी हा पूर्णपणे कंगना रनौतचा चित्रपट आहे. तिनं 16 वर्षांच्या किशोरवयीन मुलीपासून ते मध्यम वयापर्यंत जया यांचं पात्र अतिशय परिश्रमपूर्वक आणि सुंदरपणे साकारले आहे.
अभिनयाने जिंकले मन
तिचं शरीरही पडद्यावर काळानुसार बदलतं आणि हे हिंदी चित्रपटांमध्ये क्वचितच दिसून येतं. बरं, या चित्रपटातून केवळ कंगनाच नाही, तर थिएटर मालक देखील आशा व्यक्त करत आहेत की या कठीण काळात, जिथं अजूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक कमी आहेत, त्यांनी कंगनाची ही शक्तिशाली भूमिका पाहायला यायला हवी जेणेकरून बॉक्स ऑफिस समृद्ध होऊ शकेल. कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती धाकड आणि तेजस सारख्या चित्रपटांमध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे.