लग्नानंतर प्रत्येक तरुणीची काही गोड स्वप्ने असतात, ही स्वप्न पहिल्याच रात्री चक्काचूर होत असतील तर त्या तरुणीला किती वेदना होत असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नवी दिल्लीतील करावल नगर भागातील एका तरुणीवर अशा वेदना सहन करायची वेळ आली आहे.
लग्नानंतर ही तरुणी जेव्हा सासरी आली तेव्हा पहिल्याच रात्री नवऱ्याने तिला काळी, जाडी म्हणून हिणवायला सुरुवात केली. त्याने तिच्यासोबत लग्नाची पहिली रात्रही घालवली नाही. यानंतर तिचा नवरा तिच्यापासून सतत दूर राहायला लागला. यामुळे वैतागलेल्या तरुणीने तिच्या नवऱ्याला खडसावून जाब विचारला असता त्याने सांगितलं की त्याला त्याची वहिनी आवडते.
यानंतर नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी आपल्याला सातत्याने हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली असून तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे. सासरच्यांनी लग्नानंतर मला अशा घरात ठेवलं जिथे ना वीज होती, ना पाणी होतं असंही पीडितेने म्हटलं आहे. या घरात माझा नवरा मला सोडून त्याच्या वहिनीकडे निघून जायचा असं या तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी नवरा आणि सासू सासऱ्यांसह अन्य काही जणांविरोधात पोलीस हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.