छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये कलाकरांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता शिवलीला यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. पण त्या घरातून बाहेर का पडल्या? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
नुकतच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले “इथला प्रत्येक माणूस माझा असेल.” त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. त्यामुळे आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहणार आहेत.