‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या पर्वामध्ये बुधवारी एका महिला स्पर्धकासोबत फारच आश्चर्यकारक घटना घडली. अर्थात या शोमध्ये एक कोटींच्या प्रश्नावर पोहचलणारी ती पहिली महिला नव्हती तरी एक कोटींचा प्रश्न ऐकल्यानंतर तिने आत्मविश्वास नसल्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला जिंकलेले ५० लाख अमिताभ बच्चन यांनी ट्रान्सफर केले. मात्र नंतर जे घडलं ते आश्चर्यचकित करणारं होतं. तिने खेळ सोडल्यानंतर अंदाज म्हणून दिलेलं एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर निघालं. हा सारा ड्रामा घडला सविता भाटी यांच्यासोबत.‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहते. मात्र, काही मोजक्याच स्पर्धकांचे हे स्वप्न पूर्ण होते. याच मोजक्या स्पर्धकांमध्ये बुधवारी सविता यांचाही समावेश झाला. काही दिवसांपूर्वीच या शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आलेला ज्यात अमिताभ पेशाने नर्स असणाऱ्या सविता यांना एक कोटींचा प्रश्न विचारताना दिसले होते. त्यामुळेच हा प्रश्न काय असेल?, सविता एक कोटी रुपये जिंकतील का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांनाच पडलेले. या प्रश्नांची उत्तर बुधवारच्या भागात मिळाली.
सविता भाटी यांनी एक कोटींच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं असतं तर त्या एक कोटी जिंकणाऱ्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या माहिला ठरल्या असत्या. मात्र ए कोटींच्या प्रश्नापर्यंत त्यांच्या सर्व लाइफलाइन संपल्या होत्या. त्यामुळेच ५० लाखांवरुन थेट तीन २० वर येण्याचा धोका पत्कारण्याऐवजी खेळ सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र सविता यांनी ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली ती पाहून अमिताभही प्रभावित झाल्याचं पहायला मिळालं. कोणते प्रश्न त्यांना विचारण्यात आले पाहुयात…
आर्या रजेंद्रन ही २१ वर्षांच्या वयामध्ये कोणत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येत महापौर झाली? असा एक प्रश्नही या ५० लाखांच्या प्रवासामध्ये सविता यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर होतं, तिरुवनंतपुरम.
इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये मथुरा हे शहर कोणत्या राजाच्या राज्याची राजधानी होतं? असाही एक प्रश्न सविता यांना विचारण्यात आलेला. या प्रश्नाचं त्यांनी बरोबर उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर होतं शूरसेन.
एक कोटींचा प्रश्न काय होता?एक कोटी रुपयांसाठी सविता यांना पहिल्या महायुद्धाशीसंबंधित प्रश्न विचारण्यात आलेला. पहिल्या महायुद्धात टर्कीमध्ये १९१५-१६ साली भारतीय लष्कराच्या जवळजवळ १६ हजारहून अधिक सैनिकांनी मित्र राष्ट्रांसोबतच्या फौजांसोबत एकत्र येत कोणत्या ठिकाणी युद्ध लढलं होतं? असा प्रश्न एक कोटींसाठी विचारण्यात आलेला. या प्रश्नासाठी पहिला पर्याय म्हणजे पर्याय ए म्हणून गैलिसिया, पर्याय बी म्हणून अंकारा, पर्याय सी तब्सोर आणि पर्याय डी गलीपोली असा देण्यात आलेला. मात्र या प्रश्नाच्या पर्यायांपैकी सविता यांनी एकच नाव ऐकलं होतं असं सांगितलं.
खेळ सोडला आणि उत्तर बरोबर आलं…५० लाख ही फार मोठी रक्कम असून मी अंदाज व्यक्त करुन उत्तर देणार नाही. त्याऐवजी मी खेळ सोडेन असं सविता म्हणाल्या. अमिताभ यांनी सविता यांना खेळ सोडण्यासाठी परवानगी देत त्यांच्या खात्यावर जिंकलेली ५० लाखांची रक्कम पाठवली. मात्र नंतर प्रेक्षकांना उत्तर देण्यासाठी सविता यांना एक पर्याय निवडलाय सांगितला. त्यांनी एक पर्याय निवडला. हा पर्याय लॉक केल्यानंतर सविता यांचा अंदाज बरोबर ठरला होता. या प्रश्नाचं उत्तर गलीपोली असं होतं.