अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यने सोशल मीडियावरून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण येऊ लागलं. सामंथा रूथ प्रभूने नागा चैतन्यापासून विभक्त करण्याची घोषणा केली तेव्हापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. अनेक युट्यूब चॅनल्सनी दोघांच्या घटस्फोटामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत विविध तर्क वितर्क लढवत व्हि़डीओ शेअर केले. आयएएनएसच्या वृत्तानुसार आता समांथाने काही युट्यूब चॅनल्स विरोधात कायदेशीर पाऊल उचललं आहे.
समांथाने तिच्या खागसी आयुष्याबद्ल बातम्या देणाऱ्या काही वाहिन्यांविरोधात “अपमानजनक माहिती प्रसारित”केल्याचा आरोप करत अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय. सुमन टीव्ही, तेलुगू पॉप्युलर टीव्ही आणि इतरही काही युट्यूब चॅनल विरोधात तिने दावा दाखल केलाय. त्यामुळे या चॅनल्सच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चॅनल्सना सामंथाकडून त्यांच्या संबंधित वाहिन्यांवर तिची प्रतिमा बदनाम केल्याबद्दल कायदेशीर नोटिसा मिळणार असल्याचं आयएएनएसच्या वृत्तात म्हंटलंय.
तसचं याच वृत्तात समांथाने वेंकट राव नावाच्या वकिलाविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असल्याचं म्हंटलंय. व्यंकटेश राव यांनी समांथाच्या वैवाहिक जीवनाबद्दल तसचं तिचं प्रेमप्रकरण असल्याने घटस्फोट घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं.
घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर समांथावर अनेकांनी निशाणा साधला होता. समांथाच्या प्रेमप्रकरणामुळे तिच्यात आणि नागा चैतन्यात दुरावा निर्माण होवून घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तर अनेक युट्यूब चॅनल्सनी तशा प्रकारचं वृत्तही दाखवलं. काही चॅनल्सने समांथाचं तिच्या डिझायनरसोबत अफेर असल्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. तर यापूर्वीच समांथाने तिच्यावर केले जाणारे सर्व आरोप फेटाळून लावले होते. समांथाने एक पोस्ट शेअर केली होती. “माझ्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक संकटानंतर तुम्ही दिलेल्या भावनिक आधारामुळे मी फार भारावली आहे. माझ्याबद्दल इतकी दया दाखवल्याबद्दल आणि माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि इतर विचित्र गोष्टींपासून माझे संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद,” असं समांथा तिच्या पोस्टमध्ये म्हणाली होती.