बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. काजोल तिचा अभिनय असो किंवा फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच काजोलने एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी काजोल एका वेगळ्या अंदाडात दिसली. मात्र, काही लोकांना काजोलचा ड्रेस आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल केले आहे.
काजोलने नुकतीच फिल्मफेअरच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी काजोल एका वेगळ्या अंदाजात दिसली. सोशल मीडियावर काजोलचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बॉलिवूड पॅप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत काजोलने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मात्र, नेटकऱ्यांना तिचा ड्रेस आवडला नाही आणि त्यांनी ट्रोल केले आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत काजोलला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने काजोलची तुलना बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेदशी केली आणि म्हणाला “उर्फीचा रोग हिला लागला की काय?” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे की ती त्या हिल्समध्ये अनकम्फर्टेबल आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तिने असा ड्रेस का परिधान केला आहे…ती ड्रेस आणि साडीत सुंदर दिसते.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “तिला माहितीये ती खाली पडणार,” अशा अनेक कमेंटक करत नेटकऱ्यांनी काजोलला ट्रोल केले आहे.
दरम्यान, काजोल सगळ्यात शेवटी तन्वी आजमी आणि मिथिला पालकरसोबत ‘त्रिभंगा’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच काजोल एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात काजोल ससी ललिता आणि धनुषसोबत ‘वेलैइला पट्टाधारी ३’ आणि शाहरुख खानसोबत राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटात दिसणार आहे.