बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षित अशा लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी इतिहासावर आधारीत ’83’ हा चित्रपट आहे. कालच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून यावर कौतुकांचा वर्षाव होतं आहे. मात्र, या सगळ्यात प्रेक्षकांचे लक्ष हे ट्रेलरमध्ये असलेल्या एका मुलाने वेधले आहे. नेटकऱ्यांच्या मते ट्रेलरच्या ३ ऱ्या मिनिटाला जो मुलगा एका पुरुषाच्या खांद्यावर दिसत आहेत तो कुरळे केसांचा मुलगा हा दुसरा कोणी नसून सचिन तेंडुलकर असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. तर सचिनने बऱ्याच मुलाखतींमध्ये आधी सांगितलं होतं की १९८३ च्या वर्ल्ड कपने त्याचे आयुष्यच बदलून टाकले होते. एवढचं काय तर यामुळे त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
यावर नेटकऱ्यांनी अनेक पोस्ट देखील केल्या आहेत. कारण जेव्हा १९८३ मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सचिन १० वर्षांचा होता आणि ट्रेलरमधला मुलगा ही तेवढाच दिसत आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांच्या या सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
एक नेटकरी ट्वीट करत म्हणाला, “मी चुकीचा असू शकतो, पण तरीही पैज लावण्यासाठी तयार आहे. जो हा १० वर्षांचा मुलगा दाखवण्यात आला आहे हा सचिन तेंडुलकर आहे. जर हे खरं आहे तर या चित्रपटात फक्त खेळाच्या मैदानावर काय झालं हेच दाखवलं जाणार नाही तर त्या पलिकडे जाऊन यामुळे एका पिढीला कशी प्रेरणा मिळाली ते देखील पाहायला मिळेल.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मला असं वाटतयं की मी 83 मध्ये सचिनला विजयसोबत वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदात नाचताना पाहिलं.” तिसरा नेटकरी म्हणाला, “सचिन तेंडूलकर 83 च्या ट्रेलरमध्ये.”
’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.