दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने अभिनेत्री (Marathi Actress) वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या पहिल्याच चित्रपटापासून त्या लोकप्रिय झाल्या होत्या. वर्षा यांनी मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी, कोंकणी, राजस्थानी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी पार केलेल्या वर्षा आजही तितक्याच सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापुढे तरुण अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील. वर्षा यांच्या करिअरमधील एका फोटोशूटची खूप चर्चा झाली होती. वर्षा यांनी टॉपलेस फोटोशूट केलं होतं आणि त्या फोटोशूटमुळे कलाविश्वात खळबळ उडाली होती. एका इंग्रजी मासिकासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. (Varsha Usgaonkar ToplessPhotoshoot)
‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधील वर्षा उसगांवकर यांचं काम प्रेक्षकांना आवडलं. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ‘तिरंगा’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांनी एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. मात्र त्यांचं हे फोटोशूट चाहत्यांना रुचलं नाही. त्यावेळी त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
१० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅकसध्या वर्षा उसगांवकर या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारत आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. ‘सुख म्हणजे..’ मालिकेत वर्षा यांचा घरंदाज सासूचा अंदाज प्रेक्षकांना फारच आवडला आहे.