मुंबई : 1 जूनपासून राज्यातील लॉकडाऊनमध्ये ब्रेक द चेनच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला होता. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण आता निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. ज्या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट कमी असेल आणि बेडची उपलब्धता असेल तिथल्या लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार लवकरच याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण संख्या कमी तिथं जिल्हाबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण संख्या कमी तिथं मॉल्स, सिनेमागृह, क्रीडांगणे सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे.
राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. पण यावेळी काही निर्बंधांमध्ये दिलासा देण्यात आला होता. दुकाने 11 ऐवजी आता 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.