मुंबई : मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. पण असं असलं तरी मुंबईचा समावेश दुसर्या टप्प्यात होणार नाहीये. पण मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने घेतला आहे.
मुंबईचा आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट ४.४०% वर आला मात्र, तरीही मुंबई लेव्हल ३ मध्येच राहणार आहे. सध्या तरी चालू नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाहीत. पॉझिटीव्हिटी रेट काही काळ स्थिर राहिल्यानंतरच नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, पॉझिटीव्हीटी दर घसरल्यानंतर सध्या तरी मुंबईला लेव्हल ३ चेच निकष लागू असणार आहेत.
जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट (१० जून)
अहमदनगर – २.६३अकोला – ५.३७अमरावती – ४.३६औरंगाबाद – ५.३५बीड – ५.२२भंडारा – १.२२बुलढाणा – २.३७चंद्रपूर – ०.८७धुळे – १.६गडचिरोली – ५.५५गोंदिया – ०.८३हिंगोली – १.२०जळगाव – १.८२जालना – १.४४कोल्हापूर – १५.८५लातूर – २.४३मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०नागपूर – ३.१३नांदेड – १.१९नंदुरबार – २.०६नाशिक – ७.१२उस्मानाबाद – ५.१६पालघर – ४.४३परभणी – २.३०पुणे – ११.११रायगड – १३.३३रत्नागिरी – १४.१२सांगली – ६.८९सातारा – ११.३०सिंधुदुर्ग – ११.८९सोलापूर – ३.४३ठाणे – ५.९२वर्धा – २.०५वाशिम – २.२५यवतमाळ – २.९१