अभिनेत्री कंगणा राणावत हिने टाइम्स नाऊ या चॅनलवरच्या मुलाखती देताना भारत देशाला १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले ते स्वतंत्र नसून भिख होती, अशा प्रकारचे वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्रासाठी ज्या लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले व तुरुंगवास भोगले व प्राणाचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारांकचा व शहिदांचा अपमान केला ज्यामुळे आमच्या देश प्रेमाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून हा आमचा व देशाचा अपमान केला.
त्यामुळे अभिनेत्री कंगणा राणावत व टाइम्स नाऊ या चॅनलवर देशद्रोह, समाजात तेढ निर्माण करणे, समाजाच्या भावना दुखावणे यासारखे गंभीर प्रकार केले असल्याने त्यांचावर आयपीसी कलम ५०४, ५०५ आणि १२४- अ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी सत्यमेय जयते या सामाजिक संघटनेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे यांच्याकडे केली असून या वेळी संघटनेचे अफझल देवळकर, अध्यक्ष, सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सरदार विक्की आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपला,सुनील शिरीषकर,सत्यमेय जयते संघटना.