भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेना आणि खुद्द महापौरांनी केला होता. यानंतर राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. यासंदर्भात आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी शिवसेना मात्र शेलारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये.
आशिष शेलार यांच्यावर बोचरी टीका करणारे पोस्टर्स मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजपा प्रदेश कार्यालय समोर रात्री लावण्यात आले होते. यामध्ये आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या वेषात दाखवण्यात आलंय आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.