मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले तर आठ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. देशभरात 98 हजार कोरोना रुग्णांची नोंद झालीय. मुंबईतही 15 हजार 166 रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत काही गोष्टी स्पष्टपणानं मांडल्या आहेत. ओमिक्रॉनमुळं आलेली सध्याची लाट सौम्य आहे. मात्र, निष्काळजी व्हायला नको आणि निष्कारण भीतीची लाट देखील नको, असं आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केलं आहे.
राज्यात कोविडचे २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले असून मुंबईतील बुधवारी नोंदवले गेलेल्या 15014 रुग्णांपैकी 87 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुणे जिल्ह्यातील आजच्या 2833 रुग्णांपैकी 85 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत.
#CoronavirusUpdates५ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- १५१६६२४ तासात बरे झालेले रुग्ण-७१४बरे झालेले एकूण रुग्ण-७५२७२६बरे झालेल्या रुग्णांचा दर-९०%एकूण सक्रिय रुग्ण- ६१९२३दुप्पटीचा दर-८९ दिवसकोविड वाढीचा दर (२९ डिसेंबर- ४ जानेवारी)-०.७८%
#CoronavirusUpdates५ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- १५१६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-७१४
बरे झालेले एकूण रुग्ण-७५२७२६बरे झालेल्या रुग्णांचा दर-९०%
एकूण सक्रिय रुग्ण- ६१९२३
दुप्पटीचा दर-८९ दिवसकोविड वाढीचा दर (२९ डिसेंबर- ४ जानेवारी)-०.७८%
राज्यातील कोविड साठीच्या एकूण बेड संख्येच्या 3.84 टक्के बेड्सवर सध्या रुग्ण आहेत. बाकीची बेड मोकळी आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना केली तर 4 मार्च 2021 रोजी राज्यात 85144 ॲक्टिव रुग्ण होते आणि आज 87505 ॲक्टिव रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत जवळपास एवढ्याच रुग्ण संख्येत 8527 रुग्ण ऑक्सिजन बेड वर होते आज त्यांची संख्या 2560 म्हणजे जवळपास एक तृतीयांश पेक्षाही कमी आहे.
डॉ. प्रदीप आवटे यांनी ओमिक्रॉनमुळे आलेली ही लाट सौम्य आहे,असे आता तरी दिसत असल्याचं म्हटलंय. नागरिकांनी निष्काळजी व्हायला नको पण निष्कारण भीतीची लाट देखील नको, असल्याचं मत आवटे यांनी मांडलंय.