कापडणे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेकडो वर्षे पूर्वीचे शिक्षणाचे वय मुली महिलांची प्रगती नाही व त्या शिवाय समाजाचा विकास होणार नाही हे ओळखून त्या दिशेने आपले काम सुरू केले होते.प्रस्थापित समाजाने त्या कामाला विरोध केला.तेव्हा त्यांनी माघार न घेता संघर्ष केला.आज त्यांचे विचार आधुनिक समाजाला दिशादर्शक ठरत आहेत.असे प्रतिपादन माजी नगरसेवक रविराज भामरे यांनी केले ते राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ वेळी बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत शिरपूर येथील विद्यार्थिनी नमिता सुनील पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला तर दुसरा क्रमांक (विभागून) रामेश्वर बागुल व शुभम बाविस्कर यांनी मिळवला,तृतीय क्रमांक ( विभागून) स्नेहल गुंजाळ व जयेश सोनार यांनी मिळवला. तर चतुर्थ क्रमांकसंस्कृती जिजाबराव माळी,उत्तेजनार्थ पारितोषिकेवरून घरटे, महेश कलाल, भूमिकेत सोनवणे व आर्यविर रवंदळे उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र ठरले. विजेत्यांना रोख रक्कम ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक रविराज भामरे यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक विशाल देवरे, युवा वक्ते जितेंद्र पवार,एन . डी .पाटील भूषण पाटील, सागर निकम, प्रमित शिंदे, प्रवीण मोरे, ललित त्रिभूवन,राहुल मराठे, भगवान महाजन,सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण धुळे जिल्ह्याचे प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ.सुशील महाजन, माजी कृषी सभापती रामकृष्ण खलाणे,महेश अहिरे ,बापूसाहेब महाजन ,भूपेश वाघ, सागर पाकळे,पत्रकार जिजाबराव माळी, डॉ. लेखराज शिंदे, अभिजित पवार,अक्षय सोनार ,नितीन सोनवणे,सुनील माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
परीक्षक म्हणून एड. रामजी यशोद( चाळीसगाव )व सुयश ठाकूर (चोपडा) यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. सतीश अहिरे ,शुभम महाराज रावते, प्रीतम निकम ,अश्विनी पाटील ,जयेश मुसळे ,प्राजक्ता कोथंबिरे ,प्रगती कराळे ,सिद्धांत बोराडे स्वामिनी पारखे यांनी अथक परिश्रम घेतले.