मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबईत (Mumbai) कोरोनाची तिसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची (Corona) लाट ओसरायला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे. शहरात 1 जानेवारीला पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. जवळपास तीन आठवडय़ातच उच्चांक गाठलेली ही लाट त्याच वेगाने ओसरत आहे. मुंबईत 21 डिसेंबरपासून वेगाने वाढत असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने जानेवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ात 20 हजारांच्या घरात पोहोचली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्याही जवळपास एक लाखांच्याही वर गेली. परंतु जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उताराला लागल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारापर्यंत कमी झाली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सक्रिय रुग्णांची संख्याही 50 हजारापर्यंत खाली आली आहे. शहरात 50 हजार उपचाराधीन रुग्ण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होते. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींच्या संख्येतही घट होत असून सध्या शहरात 52 इमारती प्रतिबंधित आहेत, तर एकही चाळ किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.
जानेवारीच्या 10 तारखेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या जास्त होती. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. 26 जानेवारीपर्यंत मुंबईत रुग्णसंख्या 1000 ते 2000 या दरम्यान येईल. त्यामुळे 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासंबंधी नियोजन असल्याचे इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.
7 जानेवारीला मुंबईत सर्वाधिक 20971 रुग्ण संख्या आढळून आली होती तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्येची आकडेवारी 11573 होती. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि मृत्युदर याचे प्रमाण कमी असल्याचे देखील इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.