धुळे : देऊर (ता.धुळे) परिसरातील गावांमधील खावटी अनुदान योजनेपासून वंचित असलेल्या कुटुंबीयांना नुकतेच खावटी वाटप करण्यात आले.धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघ यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प येथे पाठपुरावा करत अक्षय साळुंके यांनी निवेदन दिले होते. शिवाजी हायस्कूल मोराणे येथे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अक्षय साळुंके यांच्या शुभ हस्ते 200 लोकांना खावटी वाटप करण्यात आली.त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाप्पू दादा पारधी , जिल्हाप्रमुख सुनील पारधी आणि जिल्हा परिषद सदस्य जिजाबाई पारधी आणि नवल पारधी हे हजर होते.
प्रतिनिधी :- चेतन सोनवणे मुकटी (धुळे)