मुंबई : घरी किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईमुळे अनेक लोक रेल्वे प्रवासामध्ये आपले प्राण गमावून बसतात. वेगात जात असलेल्या लोकलमध्ये बसण्याच्या प्रयत्नात हे अपघात (Accident) झालेले असतात. अशा अपघातात दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, दादर रेल्वे स्थानकात रेल्वेमध्ये (Railway) बसण्याची घाई करणाऱ्या अशाच एका प्रवाशाचा एका वरीष्ठ टीसीने जीव वाचवला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, प्रवासी चालत्या रेल्वेमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार 15/01/22 रोजी दादर स्थानकावर ड्युटीवर असताना नागेंद्र मिश्रा या वरिष्ठ तिकीट परीक्षकाला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील दरीमध्ये एक प्रवासी पडताना दिसला. त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळेत प्रवाशाला बाहेर काढण्यात यश मिळविले. टीसींच्या या समसूचकतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला.नागेंद्र यांच्या या धाडसी कृत्याचं सध्या कौतूक केलं जातंय.
पाहा व्हिडीओ :