विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे करण्यात येणारं आदोलन काँग्रेसने स्थगित केलं आहे. सोमवारी सकाळी आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान दिलं होतं. दरम्यान आंदोलनासाठी निघालेल्या नाना पटोले यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजप कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. भाजपा कार्यालयांपुढे निदर्शने झाल्यावर सोमवारी फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केलं जाणार होतं. दरम्यान या आंदोलानमुळे भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांना काही ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं आहे.