मुंबईत उद्या मेगाब्लॉक

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान दोनही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक आठ तासांचा असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, गाड्या उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशराने धावतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे

Comments : 0


    No Comments

Leave a comment