धुळे : धुळे येथील डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात गणित विभागातर्फे आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. पूर्वी हाच दिवस Pi (π)डे म्हणून साजरा करण्यात येत होता. परंतु युनेस्कोने आयोजित केलेल्या २०१९ च्याआंतराष्ट्रीय परिषदेत त्याचे आंतरराष्ट्रीय गणित दिवस असं नामकरण करण्यात आले. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी Pi(π) या संज्ञेविषयी विविध गणितीय पोस्टर्स सादर केली. त्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांनी केले. गणित विभागाचे प्रमुख प्रा. एम. डी. सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कु.निकिता पाटील, कु.भाग्यश्री पाटील, कु.मेघना देसले,कु.पूजा गावंडे व श्री.शिवाजी वायसे यांनी आपले पोस्टर्स सादर केले.यावेळी उप प्राचार्य प्रा.के. एम.बोरसे, प्रा.ए. एस. पाटील आणि इतर सहकारी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे मुकटी