धुळे : स्त्री ही स्वतःच खंबीर असते.ती कुठेही कमी पडत नाही .प्रगतीच्या सर्वच क्षेत्रात ती आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते.अनेक क्षेत्रात तीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान अजूनही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी समाजातील पुरुषी मानसिकता बदलने खूप आवश्यक आहे असे आवाहन प्रा. डॉ स्वाती पाटील यांनी केले. *जागतिक महिला दिनानिमित्त* डॉ. पां. रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयात गणित विभागातर्फे कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.अजूनही मुलगी घराबाहेर पडते त्यावेळी तिला अनेक सूचना दिल्या जातात. परंतु मुलांना मात्र कोणतेही बंधन नाही ही शोकांतिका आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पोस्टर्स आणि वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी आणि प्रा. डॉ. रुपाली पाटील यांनी काम पाहिले. प्रा. डॉ. रुपाली पाटील यांनी स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही. पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.गणित विभागाचे प्रमुख प्रा.एम.डी. सूर्यवंशी, प्रा.ए.एस.पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी व कर्मचारी उपस्थित होते.
Very nice program organised by mathematics department of Dr.P.R. Ghogre science College