कर्वायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्री शिवाजी विदया प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण विभाग व युवती सभेअंतर्गत स्वयंसिध्दा अभियान कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील, उपप्राचार्य के.एम. बोरसे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. आय. एस. अहिरराव, कराटे प्रशिक्षक प्रा. संदीप बाविस्कर, युवती सभा समन्वयक डॉ. रुपाली पाटील व युवती सभा सदस्य यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. ज्योती ढोले यांनी केले. परिचय आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका अश्विनी पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांनींचा सर्वांगीण विकास होणेसाठी युवती सभा हे माध्यम विद्यापीठाने उपलब्ध केलेले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. समाजात वावरताना आत्मसंरक्षण अत्यंत गरजेचे झाले आहे त्यासाठी स्वयंसिध्दा अभियान राबविले जाते असे प्रास्ताविक डॉ. रुपाली पाटील यांनी केले.
खंबीर मनाबरोबर शरीर पण खंबीर ठेवणे महिलांना अत्यंत आवश्यक आहे. आहार व शरीर यांचा ताळमेळ ठेवावा शस्त्र न घेता लढण्याचे प्रशिक्षण म्हणजे ज्यूडो कराटे आहे असे उपप्राचार्य के. एम. बोरसे सर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या उपलब्ध करुन दिलेल्या विविध उपक्रमांचा फायदा घेऊन मुलींनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी उत्साहाने सहभाग नोंदवावा असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. आय. एस. अहिरराव यांनी केले. सर्व क्षेत्रात परीपुर्ण असलेली स्त्री स्वसंरक्षणातच मागे राहु नये म्हणुन शरीराचे सक्षमीकरण केलेच पाहिजे असे कराटे प्रशिक्षक प्रा.संदीप बाविस्कर सरांनी सांगितले. अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डॉ.एम.व्ही. पाटील म्हणाले की स्वतःला सिध्द करणे जीवनात अत्यंत महत्वाचे असुन अन्यायाच्या विरुध्द लढण्यासाठी मुलींनी रणरागीनी, कणखर व सशक्त बना. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ इतरांनाही देडुन आपल्या सारखेच त्यांनाही खंबीर बनवा असा मोलाचा संदेश दिला.
या उदघाटन प्रसंगी प्राध्यापिका सुषमा देसले, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. स्वाती पाटील, प्रा. अश्विनी पाटील, प्रा.वैशाली पाटील, प्रा. सायली नंदन या उपस्थित होत्या कार्यशाळेस विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे